रईस सिनेमाला शिवसेनेचा विरोध?

 Grant Road
रईस सिनेमाला शिवसेनेचा विरोध?
रईस सिनेमाला शिवसेनेचा विरोध?
See all

मुंबई - शाहरुख खानच्या रईस या सिनेमाला कल्याणमध्ये शिवसेनेनं विरोध केला आहे. कल्याणमधील शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांनी मल्टीप्लेक्सला चित्रपट प्रदर्शित होऊ न देण्याचं निवेदन दिलं आहे. तसंच चित्रपट प्रदर्शित केला तर शिवसेना स्टाईलने विरोध करु असंही सांगितलंय. तर, शिवसेनेचा पाकिस्तानी कलाकारांना नेहमीच विरोध राहणार. अद्याप रईस सिनेमाबाबत अधिकृत भूमिका घेतली नसल्याचं शिवसेना चित्रपट संघटनेचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी स्पष्ट केलंय.

शाहरुख खानने या आधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज ठाकरे यांचा रईस या चित्रपटाला विरोध मावळला होता. येत्या 25 जानेवारीला रईस रिलीज होणार आहे.

Loading Comments