मतांसाठी कायपण?

 Kandivali
मतांसाठी कायपण?
Kandivali, Mumbai  -  

कांदीवली - महापालिका निवडणुकीसाठी मुंबईमध्ये सर्वत्र मतदान सुरू आहे. मात्र काही ठिकाणी मतदारांना कोडच्या माध्यमातून मतदान करण्याचं आवाहन काही पक्षांकडून केल्याचा प्रकार कांदिवलीच्या ठाकूर व्हिलेजच्या वॉर्ड क्रमांक 25 मध्ये पाहायला मिळाला. पोलिंग बुथच्या आसपास 3 आणि 2 आकडा लिहिलेले टी-शर्ट घालून काही कार्यकर्ते फिरताना पाहायला मिळत होते. हे युवक या नंबरवर वोट करा अशा खाणाखुणा मतदारांना करत असल्याचा आरोप शिवसेनेनेच्या योगेश भोईर यांनी केलाय. दरम्यान निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केल्यानंतर या तरुणांना बाहेर काढले.

Loading Comments