Advertisement

सरकार बरखास्त करा, ओबीसी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी

मराठा समाजाला स्वतंत्र एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात ओबीसी आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे. केवळ शब्दछल करत हे सरकार ओबीसी-मराठा समाजाबरोबर सर्वच समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचं म्हणत ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आता थेट राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे धाव घेतली आहे.

सरकार बरखास्त करा, ओबीसी नेत्यांची राज्यपालांकडे मागणी
SHARES

मराठा समाजाला स्वतंत्र एसईबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यात आल्याचं राज्य सरकारकडून सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्षात ओबीसी आरक्षणातूनच मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं आहे. केवळ शब्दछल करत हे सरकार ओबीसी-मराठा समाजाबरोबर सर्वच समाजाची आरक्षणाच्या नावाखाली फसवणूक करत असल्याचं म्हणत ओबीसी समाजाच्या नेत्यांनी आता थेट राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्याकडे धाव घेतली आहे. हे सरकार फसवं सरकार असल्याचं म्हणत सरकार बरखास्त करण्याची मागणी ३० ओबीसी नेत्यांच्या शिष्टमंडळानं मंगळवारी राज्यपालांची भेट घेत त्यांच्याकडे केल्याची माहिती ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी मुंबई लाइव्हशी बोलताना दिली आहे.


मराठा समाजाची दिशाभूल

मराठा समाजाची आरक्षणाची मागणी मान्य करत मराठा समाजाला नुकतचं १६ टक्के आरक्षण लागू करण्यात आलं आहे. एसईबीसी या स्वतंत्र प्रवर्गाअतंर्गत हे आरक्षण देण्यात आलं आहे. ओबीसी नेते मात्र हे स्वतंत्र आरक्षण नसल्याचा दावा करत आहेत. ओबीसी आरक्षणातूनच हे आरक्षण देण्यात आलं असून सरकार शब्दांचे खेळ खेळत असल्याचा ओबीसी नेत्यांचा आरोप आहे. तर सरकार ओबीसी आणि मराठा समाजाची दिशाभूल करत असल्यानं या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीही अधिकार नाही असं म्हणत ओबीसी नेत्यांनी सरकार बरखास्त करण्याची मागणी राज्यपालांकडे केली आहे.


न्यायालयात याचिका दाखल

यावेळी शेंडगे यांच्यासोबत आमदार हरिभाऊ राठोड आणि इतर २८ ओबीसी नेते हजर होते. दरम्यान ओबीसी आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. या याचिकेदरम्यान न्यायालयात सरकारकडून योग्यरित्या बाजू मांडली जात नसल्याचंही यावेळी शेंडगे यांनी स्पष्ट केलं आहे. 



हेही वाचा -

हॅकर शुजाचा दावा निवडणुक आयोगानं फेटाळला

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचं बुधवारी भूमिपुजन, कामाची जबाबदारी एमएमआरडीएकडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा