Advertisement

शिवसेनेच्या शिवजयंती कार्यक्रमात भोजपुरी गाण्यावर अश्लील नृत्य

शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवामध्ये भोजपुरी गाण्यावर अश्लील हावभार करणारे नृत्य सादरीकरण होते आणि त्याला उपस्थित प्रेक्षक दाद देतात हे क्लेशदायक वाटावं असंच कृत्य आहे. आणि त्याहून जास्त खेदजनक बाब म्हणजे हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेच्याच एका नेत्याने आयोजित केला होता.

शिवसेनेच्या शिवजयंती कार्यक्रमात भोजपुरी गाण्यावर अश्लील नृत्य
SHARES

छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम मराठीजनांचं, महाराष्ट्रीय लोकांचं आणि जगभरात त्यांना मानणाऱ्या व्यक्तींचं आराध्य दैवत. परस्त्री ही मातेसमान, परस्त्रीचा आदर-सन्मान ही छत्रपती शिवाजी महाराजांची तत्व होती हे आपल्याला इतिहास सांगतो. मात्र, त्याच शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवामध्ये भोजपुरी गाण्यावर अश्लील हावभार करणारे नृत्य सादरीकरण होते आणि त्याला उपस्थित प्रेक्षक दाद देतात हे क्लेशदायक वाटावं असंच कृत्य आहे. आणि त्याहून जास्त खेदजनक बाब म्हणजे हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेच्याच एका नेत्याने आयोजित केला होता.



आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करून हा सगळा प्रकार समोर आणला आहे. नितेश राणेंनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये एका भोजपुरी गाण्यावर एक महिला अश्लील हावभाव करत नृत्य करताना दिसत आहे. स्टेजच्या बॅकग्राऊंडवर लावलेल्या फ्लेक्सवर 'शिवजयंती उत्सव' असे लिहिले असून सर्वात वर शिवसेना असे लिहिले आहे.

या ट्विटमध्ये नितेश राणे म्हणतात, "छत्रपती शिवजी महाराजांच्या दरबारात कधी स्त्रीचा अपमान झाला नाही, नाचणं तर खूप लांबची गोष्ट आहे. पण वॉर्ड क्र. 14 मध्ये शिवसेनेने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात खूप लाजिरवाणी प्रकार झाला. भोजपुरी गाण्यावर अश्लील नृत्य झाले. या घटनेचा निषेध निषेध निषेध!!"


 

हा व्हिडिओ मुंबईच्या बोरीवली पूर्व परिसरातल्या वॉर्ड क्रमांक १४ मधील आहे. छत्रपतींच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षाने त्याच छत्रपतींच्या जयंती उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कथित 'सांस्कृतिक' कार्यक्रमामध्ये अशा प्रकारचा 'नृत्याविष्कार' करावा हे धक्कादायक आहे!

दरम्यान, आमदार नितेश राणेंनी हा व्हिडिओ ट्वीट केल्यानंतर त्यावर अनेक संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. ट्विटरवर लोकांनी आपला राग व्यक्त केला आहे.

      


Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा