मेहता - देसाई राजीनामे द्या! विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ

 Mumbai
मेहता - देसाई राजीनामे द्या! विरोधकांचा विधान परिषदेत गदारोळ

जमीन लाटण्यासाठी बिल्डर भूमिहीन शेतकरी झाल्याची खळबळजनक माहिती देत 'एमआयडीसी'ची सुमारे २० हजार कोटी मूल्याची जमीन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बिल्डरांना दिल्याचा आरोप विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत केला.

या सर्व प्रकरणाची 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्यात यावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत सुभाष देसाई यांनी राजीनामा दयावा या मागणीसाठी विरोधकांनी वेलमध्ये येऊन घोषणाबाजी केली. प्रकाश मेहता आणि देसाई हटाव या मागणीसाठी गदारोळ झाल्याने विधान परिषद दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.

नाशिक येथील इगतपुरीतील एमआयडीसीच्या जमिनीवरील आरक्षण उठवण्यासाठी अभय नहार, कमलेश वाघेचा आणि राजेश मेहता या बिल्डर्सनी गरीब शेतकरी असल्याचे सांगून सरकारी जमीन लाटण्याचे प्रयत्न केले. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मुंडे यांनी केली.

तर, या प्रकरणात विरोधकांनी बिनबुडाचे आरोप केल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सभागृहात सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु विरोधकांनी गोंधळ घातल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.


सरकारविरोधात घोषणाबाजी

दरम्यान दोन्ही सभागृहात आक्रमक झालेल्या विरोधकांनी विधान भवनाच्या पायऱ्यावर बसून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. 'भाजपा सरकार हाय हाय', 'चोर है भाई चोर है भाजपा सरकार चोर है', असा विरोधकांच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.हे देखील वाचा -

मोपलवारांचा न्याय मेहतांना का नाही? - विखे पाटीलLoading Comments