Advertisement

देवेंद्र फडणवीसांनी सीडीआर तपास यंत्रणांना द्यावा- सचिन सावंत

फडणवीस यांनी CDR ची माहिती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तपास यंत्रणांकडे द्यावी आणि गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी, असं आवाहन सचिन सावंत यांनी केलं आहे.

देवेंद्र फडणवीसांनी सीडीआर तपास यंत्रणांना द्यावा- सचिन सावंत
SHARES

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोरील स्फोटकांचं प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणातील महत्वाचा पुरावा असलेला CDR हा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचं त्यांनीच विधानसभेत जाहीरपणे सांगितलेलं आहे. त्यामुळे फडणवीस यांनी CDR ची माहिती स्वतःकडे ठेवण्याऐवजी तपास यंत्रणांकडे द्यावी आणि गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी, असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं आहे.

विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणं त्यांचं कर्तव्य आहे. CDR मिळवणे हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने CDR racket उघडकीस आणलं होतं. 

हेही वाचा- “महाराष्ट्र कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तोंडावर अन् ठाकरे सरकार राजकारणात दंग”

नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय  योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये. स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार करतील, हा विश्वास आहे व विनंतीही आहे, असं सचिन सावंत यांनी म्हटलं आहे.

विधानसभेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप करताना हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांच्या दाव्यानुसार एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनीच हिरेन यांचा खून केला असून, या प्रकरणी वाझे यांना अटक करा,” अशी मागणी केली. यावेळी फडणवीस यांनी त्यांची तक्रारही वाचून दाखवताना या प्रकरणातील सीडीआर असल्याचाही दावा केला.

सोबतच मी सीडीआर मिळवला म्हणून सरकारने माझी चौकशी करावीच, पण खून केला त्याला पाठिशी का घालता? तुम्ही मला चौकशी लावण्याची धमकी देत आहात का?, सभागृहात बोलण्याचा आम्हाला अधिकार आहे. तुम्ही माझी चौकशी लावा. मात्र, याप्रकरणात तुम्ही शोधणार नाही, त्यापलीकडची माहिती मी मिळवून दाखवतो, असं आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

(opposition leader devendra fadnavis must submit CDR in sachin vaze case demands maharashtra congress spokesperson sachin sawant)

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा