Advertisement

“महाराष्ट्र कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तोंडावर अन् ठाकरे सरकार राजकारणात दंग”

कोविडच्या दिलेल्या लसी वापरल्या जात नसताना केंद्राकडून लसी मिळत नसल्याचे खोटेनाटे आरोप सुरू आहेत, असा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

“महाराष्ट्र कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तोंडावर अन् ठाकरे सरकार राजकारणात दंग”
SHARES

महाराष्ट्र कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या तोंडावर. ठाकरे सरकारची अनास्था जनता भोगते आहे. ट्रेसिंग, ट्रॅकिंगकडे दुर्लक्ष होत आहे. राज्य सरकार केवळ आरोपप्रत्यारोपाच्या राजकारणात दंग आहे. कोविडच्या दिलेल्या लसी वापरल्या जात नसताना केंद्राकडून लसी मिळत नसल्याचे खोटेनाटे आरोप सुरू आहेत, असा आरोप भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या संसर्गात बोलताना अतुल भातखळकर म्हणाले की, महाराष्ट्र कोविडच्या दुसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर उभा आहे, असा गंभीर इशारा केंद्राच्या आरोग्य पथकाने चार दिवसांच्या आपल्या विस्तृत पाहणी दौऱ्यानंतर केला. राज्य सरकारची अनास्था, त्यांनी पाठवलेल्या पत्रातून दिसतेय. अॅक्टिव्ह केसेसचं सर्व्हेलन्स नाही. ट्रेसिंग, ट्रॅकिंग याकडे दुर्दैवाने राज्याचं दुर्लक्ष होत आहे. 

त्यामुळे माझी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती आहे की आतातरी राजकारणाच्या बाहेर या, आरोग्यमंत्री म्हणतात की व्हॅक्सिनचे डोस कमी मिळाले. मात्र वस्तुस्थिती ही आहे की ५४ लाख डोस मिळालेत. यातील महाराष्ट्राने आतापर्यंत फक्त ४४ टक्केच डोस वापरलेत. प्रत्येकवेळेला या विषयातही राजकारण करणं आता बंद करा. केंद्राने केलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा. 

हेही वाचा- महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात..?

केंद्राने हेही म्हटलंय की नाईट कर्फ्यू आणि लाॅकडाऊन हे यावरचे खरे उपाय नव्हेत. राज्य सरकार केवळ लाॅकडाऊनची भाषा करतंय. त्यामुळे राज्याने या विषयात अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी देखील अतुल भातखळकर यांनी केली आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम ७ मार्च ते ११ मार्च दरम्यान राज्याच्या दौऱ्यावर आली होती. या टीमने ८ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. कोरोनाविषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात झाली आहे. कोरोनासंदर्भातील परिस्थितीवर राज्य सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात नसल्याचं पत्रात म्हटलं आहे. 

केंद्राच्या टीमने मुंबईतील एस आणि टी वॉर्डमध्ये तसंच ठाणे, नाशिक, धुळे औरंगाबाद, जळगाव याठिकाणी पाहणी केली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशन-क्वारंटाईन फॅसिलिटीजची काय परिस्थिती आहे, याचा आढवा या टीमनं घेतला होता.

(maharashtra government not serious about covid 19 increasing cases alleges bjp mla atul bhatkhalkar)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा