Advertisement

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम ७ मार्च ते ११ मार्च दरम्यान राज्याच्या दौऱ्यावर आली होती. या टीमने ८ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती.

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात...
(File Image)
SHARES

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरुवात झाली असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. यासंबंधीचं पत्र केंद्रीय समितीने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पाठवलं आहे. 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची एक टीम ७ मार्च ते ११ मार्च दरम्यान राज्याच्या दौऱ्यावर आली होती. या टीमने ८ मार्च रोजी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. कोरोनाविषयक सुविधांचा आढावा या समितीने घेतला होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय सचिव राजेश भूषण यांनी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची सुरूवात झाली आहे. कोरोनासंदर्भातील परिस्थितीवर राज्य सरकारकडून गंभीर पावलं उचलली जात नसल्याचं पत्रात म्हटलं आहे. 

केंद्राच्या टीमने मुंबईतील एस आणि टी वॉर्डमध्ये तसेच ठाणे, नाशिक, धुळे औरंगाबाद, जळगाव याठिकाणी पाहणी केली होती. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि आयसोलेशन-क्वारंटाईन फॅसिलिटीजची काय परिस्थिती आहे याचा आढवा या टीमनं घेतला होता.



हेही वाचा -

मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १६५ दिवसांवर

वरळी सीफेस स्कूल आणि हाजी अली पंपिंग स्टेशनजवळ बोलक्या भिंती

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा