Advertisement

भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ कुठेही सापडणार नाहीत- देवेंद्र फडणवीस

केंद्राने सेलिब्रिटींवर दबाव टाकून तर हे ट्वीट केलं नाही ना? याची चौकशी करण्याचं राज्य सरकारने काँग्रेसच्या मागणीरून ठरवलं आहे.

भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ कुठेही सापडणार नाहीत- देवेंद्र फडणवीस
SHARES

कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केंद्र सरकारची बाजू घेणारं ट्विट ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी केलं होतं. यावरून गदारोळ उडाल्यावर केंद्राने सेलिब्रिटींवर दबाव टाकून तर हे ट्वीट केलं नाही ना? याची चौकशी करण्याचं राज्य सरकारने काँग्रेसच्या (congress) मागणीरून ठरवलं आहे. त्यावर टीका करताना भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ जगात कुठेही सापडणार नाहीत, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी सोमवारी दुपारी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी, भारतरत्नाने सन्मानित केलेल्या व्यक्ती आमच्या सगळ्यांसाठी सन्माननीय आहेत. पण त्यांच्यावर कोणत्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी दबाव टाकला का? त्या नेत्याची चौकशीची मागणी काँग्रेस पक्षाने केली. 

त्यावर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या गंभीर विषयावर माझ्याशी चर्चा केली. कोरोनाची बाधा झाली असतानाही शेतकऱ्यांचा विषय असल्याने मी त्यांना भेटीची वेळ दिली. त्यांचं म्हणने ऐकून घेत या विषयावर नियमांनुसार कारवाई करण्याचं आश्वासन त्यांना दिलं, अशी माहिती अनिल देशमुख (anil deshmukh) यांनी दिली.

हेही वाचा- ठाकरे सरकार करणार सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी?

यासंदर्भातील बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये झळकल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर आपला संताप व्यक्त केला. हा प्रकार अतिशय संतापजनक आहे. आता कुठे गेला मराठीबाणा, कुठे गेला महाराष्ट्रधर्म? भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. यांचा निषेध करावा तितका थोडा आहे. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय? असा सवाल फडणवीस यांनी केला. 

भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरं तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे, असा टोला देखील देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी लगावला.

शेतकरी आंदोलनात आंतरराष्ट्रीय पाॅप स्टार रिहानाने मतप्रदर्शन केल्यावर सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांसारख्या भारतरत्नांनी सरकारची बाजू घेतली होती. परंतु त्यानंतर त्यांना सोशल मीडियावरून ट्रोलर्सच्या टीकेचा सामना करावा लागला. मात्र केंद्र सरकारने सेलिब्रिटींवर दबाव टाकून त्यांना सरकारच्या बाजूने ट्विट करायला लावलं, असा आरोप विरोधकांकडून होत आहे. 

(opposition leader devendra fadnavis slams maharashtra government on inquiry of celebrity tweets in delhi farmers protest issue)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा