Advertisement

नाना पटोले ‘या’ ऐतिहासिक मैदानात स्वीकारणार पदभार

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार नाना पटोले येत्या शुक्रवारी १२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत.

नाना पटोले ‘या’ ऐतिहासिक मैदानात स्वीकारणार पदभार
SHARES

महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे नवनियुक्त अध्यक्ष आमदार नाना पटोले येत्या शुक्रवारी १२ फेब्रुवारी रोजी मुंबईतील ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात आयोजित कार्यक्रमात पदभार स्वीकारणार आहेत. 

विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या २४ तासांच्या आत नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती (maharashtra congress president) करण्यात आली. पटोले यांच्या सोबतच ६ कार्याध्यक्ष आणि १० उपाध्यक्ष देखील नेमण्यात आले आहेत. 

कार्याध्यक्षांमध्ये सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे, शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, बसवराज पाटील, कुणाल पाटील व नसीम खान यांचा समावेश आहे. तर, उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलाश गोरंट्याल, बी आय नगराळे, शरद आहेर, माणिकराव जगताप, एम. एम. शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा- तर महाराष्ट्रात शिवसेना उरलीच नसती, अमित शहांची टीका

शुक्रवारी आॅगस्ट क्रांती मैदानात काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या उपस्थितीत माजी प्रदेशाध्यक्ष, राज्य विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (balasaheb thorat) हे नाना पटोले यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सोपवतील. याच आॅगस्ट क्रांती मैदानात १९४२ साली महात्मा गांधी यांनी इंग्रजाविरोधात ‘भारत छोडो’ आणि ‘चले जाव’ चा नारा दिला होता.  

या कार्यक्रमाला राज्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते, राज्य मंत्रिमंडळातील काँग्रेसचे मंत्री, अ. भा. काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सहप्रभारी आशिष दुआ, बी. एम. संदीप, वामशी रेड्डी, संपत कुमार, सोनल पटेल यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आमदार, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील.

(nana patole will take a charge of maharashtra congress president post in august kranti maidan mumbai)


Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा