Advertisement

विरोधकांचा चहा पानावर बहिष्कार


विरोधकांचा चहा पानावर बहिष्कार
SHARES

'राज्यातील भाजपा-शिवसेनेला सत्तेची मस्ती आली आहे. ही मस्ती महाराष्ट्रातील जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही. राज्यात मॅग्नेटिकचे नव्हे तर फ्रस्ट्रेट अर्थात नैराश्याचं वातावरण निर्माण झाले आहे', अशी टीका करत विरोधकांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त आयोजित केलेल्या राज्य सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला.


'न्यायालयात दाद मागणार'

राज्य सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात कागदपत्रांसह सर्व पुरावे सरकारला सादर केले आहेत. मात्र सरकारकडून सातत्याने क्लीन चीट देण्यात येत असल्याने सरकारवर विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचं विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.


जनताच यांची मस्ती उतरवेल-मुंडे

राज्य सरकारला सत्तेची मस्ती आली असून ही मस्ती जनताच उतरवेल. त्याचा काऊंट डाऊन सुरू झाल्याचं विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी संगितलं.


कर्जमाफीची योजना जाहीर करा

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफीची योजना जाहीर व्हायला हवी. पण सरकारने अटी-शर्तींच्या बंधनात शेतकऱ्यांना गुतंवत कर्जमाफीचा लाभच मिळू दिला नाही, असा आरोप यावेळी विरोधकांनी केला. तसेच सरकारने जितक्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली, तितक्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही.

मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून लाखो जणांना रोजगार मिळण्याच्या घोषणा केल्या जात आहेत. परंतु, प्रत्यक्षात या दोन्हीतून किती रोजगार निर्माण झाला याची माहिती राज्य सरकारनेच द्यावी. याशिवाय रोजगार आणि गुंतवणुकीबाबत राज्य सरकारने श्वेत पत्रिका काढावी, अशी मागणीही विरोधकांनी यावेळी केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा