Advertisement

युतीसाठी 'नाणार' प्रश्न महत्वाचा

शिवसेनेने भाजपसोबत युती करण्यापूर्वी नाणार प्रकल्पासाठी एमआयडीसीने काढलेल्या भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करावा. यासाठी आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

युतीसाठी 'नाणार' प्रश्न महत्वाचा
SHARES

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाणार प्रकल्पासाठी भाजपा आग्रही आहे. पण भाजपला रोखण्यासाठी नाणार प्रकल्पाविरोधात असलेल्या आंदोलनकर्त्यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची बुधवारी भेट घेतली. शिवसेनेनं भाजपासोबत युती करण्यापूर्वी नाणार प्रकल्पासाठी एमआयडीसीनं काढलेल्या भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. या प्रश्नावर तोडगा न काढता किंवा याकडे दुर्लक्ष केल्यास संघटना तात्काळ स्वतःची भूमिका जाहीर करेल, असे आंदोलन कर्त्यांकडून सांगण्यात आले आहे.


नेमके काय आहे प्रकरण

'रत्नागिरी रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेड' (आरआरपीसीएल)च्या वतीनं ग्रीन फिल्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यात येत आहे. यासाठी ३ लाख कोटींच्या रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. सुमारे १५ हजार एकर जमिनीवर हा अवाढव्य प्रकल्प उभा राहणार आहे. यामुळे इथल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून पर्यावरणावरही त्याचा परिणाम होईल. त्यामुळे रिफायनरीसाठीच्या जागेची पाहणी झाल्यापासून या प्रकल्पाच्या आजूबाजूच्या १७ गावांनी जोरदार विरोध केला आहे. या प्रकल्पासाठी जागा शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी स्थानिकांच्या बाजूनं उभा राहण्याचा निर्णय घेतला.

अध्यादेश रद्द करण्याचे आश्वासन

युतीबाबत उद्धव ठाकरेंनी निर्णय घेण्यापूर्वी 'नाणार' प्रकलापाच्या विरोधात असणाऱ्या आंदोलकांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. युती करण्यापूर्वी 'नाणार' प्रकल्पासाठी एमआयडीसीनं काढलेल्या भूसंपादनाचा अध्यादेश रद्द करून घ्यावा. अन्यथा नाणार विरोधातील संघटना तात्काळ स्वतःची भूमिका जाहीर करेल असं सांगितलं. त्यावर उद्धव ठाकरे यांनी येत्या दोन-तीन दिवसात मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकल्पाबाबत चर्चा करणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

तसंच अध्यादेश रद्द करण्याची अट ही घालणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. या बैठकीला खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांच्यासह रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यश्र कमलाकर कदम, जैतापूर अणूउर्जाविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण, रिफायनरी विरोधी शेतकरी आणि मच्छीमार समितीचे सचिव भाई सामंत याच्यासह गावकरी यावेळी उपस्थित होते.


हेही वाचा

काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

जोगेश्‍वरीत वानखेडेच्या धर्तीवर क्रिकेट स्टेडियम उभारा - रविंद्र वायकर



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा