शिवसेना-भाजपा मुंबईकरांना सोयी-सुविधा देऊ शकली नाही - पी चिदंबरम

  Mumbai
  शिवसेना-भाजपा मुंबईकरांना सोयी-सुविधा देऊ शकली नाही - पी चिदंबरम
  मुंबई  -  

  अंधेरी - मुंबईत काँग्रेसच्या प्रचारासाठी आलेले पी चिदंबरम यांनी शिवसेना, भाजपावर टीका केली आहे. जवळपास 20 वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता असूनही शिवसेना-भाजपा आजपर्यंत मुंबईकरांना मूलभूत सोयीसुविधा देऊ शकले नाहीत. चांगल्या दळणवळणाच्या सुविधा देऊ शकले नाहीत, अशी टीका पी चिदंबरम यांनी केली. अंधेरीतल्या रहेजा क्लबमध्ये एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

  ‘जो देश अंतराळात यान पाठवतो. इतके प्रगत तंत्रज्ञान ज्या देशात आहे. अशा देशातील मुंबईसारख्या आर्थिक राजधानी असलेल्या शहरामध्ये उच्च दर्जाची रेल्वे व्यवस्था लोकांना का मिळत नाही? गेल्या 20 वर्षांमध्ये शिवसेना-भाजपा महापालिकेत सत्तेवर होती. इतक्या वर्षांमध्ये हे सरकार सामान्य जनतेला चांगले रस्ते, चांगली दळणवळणाची साधने का देऊ शकले नाहीत? जेव्हा काँग्रेसचे सरकार सत्तेत होते. तेव्हा काँग्रेस मुंबईला जागतिक दर्जाचे विमानतळ, मेट्रो, मोनोरेल, वांद्रे-वरळी सागरी सेतू, ईस्टर्न फ्री-वे अशा दळणवळणाच्या सुविधा दिल्या. पण आताच्या घडीला मुंबईचा स्तर इतर शहरांच्या तुलनेत घसरत चालला आहे. त्यामुळे अशा लोकांना महापालिकेची सत्ता देण्यापेक्षा मुंबईच्या सर्वांगीण विकास करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा आणि आपल्या मताचा सदुपयोग करा,’ असे आवाहन चिदंबरम यांनी केले. या कार्यक्रमाला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम, माजी मंत्री सुरेश शेट्टी, माजी आमदार बलदेव खोसा, मुंबई युथ काँग्रेसचे अध्यक्ष गणेश यादव उपस्थित होते.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.