• शरद पवार यांना पद्मविभूषण पुरस्कार
SHARE

मुंबई - देशाचे माजी केंद्रीय कृषीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा समजला जाणारा पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. यावेळी मुंबईतील राष्ट्रवादी भवनासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आणि मिठाई वाटून आपला आनंद साजरा केला. यावेळी माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष इश्वर बाळबुधे, माजी आ. मिलिंद कांबळे, प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष गफ्फार मलिक, प्रदेश संघटक रामेश्वर पवळ आदी पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या