Advertisement

मनसेचं 'नो'पाक धोरण


मनसेचं 'नो'पाक धोरण
SHARES

मुंबई - उरी येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मनसे पाकिस्तानी कलाकारांविरोधात आक्रमक झाली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात रहात असलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासात निघून जावे, अन्यथा त्यांना 'मनसे' स्टाईलने हाकलले जाईल, असा सज्जड इशारा मनसेने शुक्रवारी दिला.

"देशाच्या सीमेवर जवान शहीद होत आहेत. पाकिस्तानविरोधात देशभरात तीव्र संताप व्यक्त होत आहे. अशावेळी आपण पाकिस्तानी कलाकारांचे कार्यक्रम पाहायचे का? कलेच्या माध्यमातून एकत्र येण्याची ही वेळ नाही. त्यामुळे मुंबईत रहात असलेल्या पाकिस्तानी कलाकारांनी 48 तासांत निघून जावे, नाहीतर त्यांना हाकलून लावण्यात येईल," असा इशारा मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी दिला.

या मुद्द्यावर बोलताना शालिनी ठाकरे म्हणाल्या, "आम्ही पाकिस्तानशी मैत्री करण्याच्या विरोधात नव्हतो. पाकिस्तानचे हल्ले कमी होताना दिसत नाहीत. पाकिस्तानी कलाकार भारतात पैसे कमावतात आणि पाकिस्तानात कर भरतात. पाकिस्तानकडून तोच पैसा भारतविरोधी कारवायांसाठी वापरला जातो". जी कंपनी किंवा निर्मिती संस्था पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेईल. त्यांचा चित्रपट प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही. शाहरुख खानचा 'रईस' आणि करण जोहरचा 'ये दिल है मुश्कील' पाकिस्तानी कलाकारांचा समावेश असलेले चित्रपट प्रदर्शित होऊ दिले जाणार नाहीत अशी धमकी मनसेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानी कलाकारांवरून मुंबईत पुन्हा खळ्ळखटॅक होण्याची शक्यता आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा