क्रिकेटच्या माध्यमातून प्रचाराच्या मैदानात

  Masjid Bandar
  क्रिकेटच्या माध्यमातून प्रचाराच्या मैदानात
  मुंबई  -  

  मस्जिद - महापालिका निवडणुका जवळ आल्याने प्रत्येक राजकीय पक्ष आपले राजकीय अस्तित्व सिद्ध करण्यासाठी झगडत आहेत. हाच प्रयत्न बी विभागातसुद्धा दिसून येतोय. कारण या भागात खास क्रिकेटच्या माध्यमातून मनसे, शिवसेना, भाजप हे तिन्ही पक्ष प्रचाराच्या मैदानात उतले आहेत. इथे एका मागोमाग एक क्रिकेट सामने भरवत आहेत. मागील अाठवड्यात 10, 11 डिसेंबर रोजी मनसेतर्फे क्रिकेट सामने भरवले होते. तर यंदा म्हणजेच 17, 18 डिसेंबर रोजी शिवसेनेतर्फे सामने भरवले. तर 24, 25 डिसेंबरला भाजपातर्फे क्रिकेट सामने भरवले जाणार आहेत. त्यामुळे निवडणुकीनिमित्त आतापासून राजकीय पक्षांनी कंबर कसल्याचं दिसत आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.