घाटकोपरच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा

 Ghatkopar
घाटकोपरच्या पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा

घाटकोपर - खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी घाटकोपरच्या पोस्ट ऑफिसमध्ये सुरू होणाऱ्या पासपोर्ट सेवेच्या कामाची पाहणी केली. वरळी येथील कार्यालय लांब असल्यामुळे घाटकोपर येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय देशाच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी घेतला होता. लवकरात लवकर पासपोर्ट सेवा केंद्राचे काम सुरू होईल असं आश्वासन किरीट सोमय्या यांनी दिलं आहे.

Loading Comments