#कुठेनेऊनठेवलामहाराष्ट्र

 Pali Hill
#कुठेनेऊनठेवलामहाराष्ट्र
#कुठेनेऊनठेवलामहाराष्ट्र
See all

मुंबई - देवेंद्र फडणवीस सरकारला सत्तेवर येऊन दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. या पार्श्वभूमीवर आज ट्विटरवर #कुठेनेऊनठेवलामहाराष्ट्र हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. या माध्यमातून दोन वर्षांत जनतेला दिलेल्या आश्वासनांचा पडलेला विसर आणि अन्य मुद्द्यांवरून भाजपाला लक्ष्य करण्यात आलंय. अनेक ट्विटरकरांनी मंत्र्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भाजपाला #कुठेनेऊनठेवला_महाराष्ट्र असा सवाल केलाय. नगर पालिका-नगरपरिषद निवडणुका, मराठा, मुस्लीम, धनगर आरक्षण, मंत्र्यांवर झालेले भ्रष्ट्राचाराचे आरोप, एकनाथ खडसे यांचा राजीनामा, पक्षातली आणि पक्षाबाहेरची आव्हानं, शिवसेना-भाजपातील सत्तासंघर्ष अशा आव्हानांनंतर आता फडणवीसांना या हॅशटॅगला सामोरं जावं लागतंय.

Loading Comments