Advertisement

'पारदर्शक' काचेतून पेंग्विन दर्शन - उद्धव ठाकरे


'पारदर्शक' काचेतून पेंग्विन दर्शन - उद्धव ठाकरे
SHARES

भायखळा - राणीबागेतील पाहुण्या पेंग्विन पक्ष्यांचे दर्शन आता अखेर मुंबईकरांसाठी खुले करण्यात आले आहे. शुक्रवारी सायंकाळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पेंग्विन कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे, मुंबईचे नवनिर्वाचित महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सभागृहनेते यशवंत जाधव आणि मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त अजॉय मेहता आदी उपस्थित होते.

पेंग्विन फक्त पुस्तकात आणि टीव्हीवरच दिसणार नाही. तर पेंग्विन आता मुंबईकरांना पारदर्शक काचेतूनही पाहता येतील, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना लगावला. पेंग्विन कक्षाच्या लोकार्पण सोहळ्यात भाजपा आणि शिवसेनेत पुन्हा एकदा राजकारण रंगत असल्याचे पाहायला मिळाले. भाजपाने या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कार टाकला. तर भाजपाच्या नेत्यांना कार्यक्रमाचे निमंत्रणच दिले नसल्याचेही समोर आले.

26 कोटी खर्च करून आंतराष्ट्रीय दर्जाची ही इमारत बनवण्यात आली असून पेंग्विनसाठी खास वातानुकूलित कक्ष बनवण्यात आले आहेत. 31 मार्चपर्यंत मुंबईकरांना मोफत पेंग्विनचे दर्शन करता येईल. त्यानंतर मात्र पेंग्विन पाहण्यासाठी प्रौढांना 100 रुपये आणि लहान मुलांसाठी 50 रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. दरदिवशी सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत नागरिकांना पेंग्विन पाहता येणार आहेत.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा