Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
52,26,710
Recovered:
46,00,196
Deaths:
78,007
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
38,859
2,116
Maharashtra
5,46,129
46,781

यही है अच्छे दिन?; वाढत्या पेट्रोलच्या दरावरून युवा सेनेची मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी

मुंबईसह देशभरात मागील काही दिवसांपासून सतत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहेत.

यही है अच्छे दिन?; वाढत्या पेट्रोलच्या दरावरून युवा सेनेची मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी
SHARES

मुंबईसह देशभरात मागील काही दिवसांपासून सतत पेट्रोल व डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहेत. सतत वाढणाऱ्या दरांमुळं सामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. शिवाय, त्यांच्यावर आर्थिकस्थिती बिघाडत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरासह स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमतीचा भडका उडाला आहे. त्यामुळं शिवसेनेची युथ विंग असलेल्या युवा सेनेनं पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरांवरून मुंबईतील वांद्रे परिसरात ठिकठिकाणी पोस्टर लावत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

वांद्रे परिसरातील रस्त्यांच्या बाजूला आणि पेट्रोल पंपावर युवा सेनेनं छोट्या होर्डिंग्ज लावल्या आहेत. यात होर्डिंग्जवर २०१५ आणि २०२१ मधील पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरातील तफावत दाखवून देत युवा सेनेनं हेच आहेत अच्छे दिन? असा उपरोधिक सवाल केला आहे. २०१५ मध्ये स्वयंपाकाच्या गॅसचा सिलेंडर ५७२ रुपयांना मिळत होता. त्याची किंमत वाढून हा सिलेंडर आता ७१९ रुपयांपर्यंत वाढल्याचं पोस्टरवर म्हटलं आहे.

२०१५मध्ये प्रती लिटर ५२ रुपयांना मिळणाऱ्या डिझलचे दर २०२१मध्ये ८८.०६ रुपयांवर पोहोचले आहेत. तर ६४.६० रुपये प्रती लिटर मिळणाऱ्या पेट्रोलचे दरही आता ९६.६२ रुपयांवर गेल्याचं युवा सेनेनं पोस्टरमधून म्हटलं आहे.

लॉकडाऊन आणि कोरोनामुळं आर्थिक झळ बसलेल्या सर्वसामान्यांच्या खिशावर पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरवाढीमुळे बोझा पडला आहे. पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीवरून युवा सेनेने यही है अच्छे दिन? असा सवाल करत मोदी सरकारविरोधात पोस्टरबाजी सुरू केली आहे. देशात पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

पेट्रोलचे दर अनेक ठिकाणी शंभरीपार गेले आहेत. तर डिझेलचे दरही ९० रुपयांच्या घरात पोहोचले आहेत. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमुळं सर्वसामान्य नागरिक जेरीस आल्याचं चित्र असून, त्यात आता स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीनं भर घातली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांवरून विरोधक सरकारवर टीका करताना दिसत आहे. 

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा