पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

 Pali Hill
पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील शिवस्मारकाच्या जल-भूमी पूजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत दाखल झाले आहेत. तसंच मुुंबई, पुणे येथील विविध विकासकामांच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधानांचं छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुदलाच्या खास विमानाने आगमन झालं. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुुंबईच्या महापौर स्नेहल आंबेकर यांनी पंतप्रधानाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली, शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.

Loading Comments