Advertisement

मोदी सरकारचा 1000 व्होल्टचा 'झटका'


मोदी सरकारचा 1000 व्होल्टचा 'झटका'
SHARES

मुंबई - काळ्या पैशाविरोधात मोदी सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात हा निर्णय जाहीर केला. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद आणि भ्रष्टाचाराला काळा पैसाच रसद पुरवतो आहे. हे लक्षात घेता तातडीनं हा निर्णय घेत असल्याचं मोदी यांनी स्पष्ट केलंय. लोकसभा निवडणुकीपूर्वी काळा पैसा बाहेर काढण्याबाबत भाजपानं वचनं दिली होती. या निर्णयामुळे काळा पैसा बाहेर येण्यास मदत होईल आणि भ्रष्टाचारही रोखला जाईल, असा विश्वास मोदी यांनी हा निर्णय जाहीर करताना व्यक्त केला.

या निर्णयावर अर्थतज्ज्ञ चंद्रकांत नेने म्हणाले की "गेल्या काही वर्षांमध्ये भारतात काळ्या पैशाचं प्रमाण वाढलंय. या एका निर्णयामुळे हजारो कोटींचा काळा पैसा शून्य किंमतीचा होणाराय. शिवाय पाकिस्तानमधून पैसा भारतात येतायेत. आता त्यालाही आळा बसेल. भ्रष्टाचाराला आळा बसायलाही मदत होणाराय. भ्रष्टाचार 100 टक्के आटोक्यात येणार नसला तरी मदत नक्कीच होईल. स्टॉक मार्केटवर तत्कालीक परिणाम दिसू शकतो. मात्र दीर्घकाळाचा विचार करता हा निर्णय नक्कीच फायदेशीर होईल. "मात्र हा निर्णय घेताना मोदी सरकारनं सर्वसामान्यांचाही विचार केला आहे. त्यामुळे घाबरून जाण्याची किंवा धावपळ करण्याची काहीच गरज नाही.

निर्णय आणि त्याची अंमलबजावणी अशी आहे 

500, 1000च्या नोटा व्यवहारातून रद्द
मंगळवारी मध्यरात्रीपासून निर्णय लागू
पाचशे, हजारच्या तुमच्याकडील नोटा बँक, पोस्टऑफिसात पॅनकार्ड, आधारकार्ड किंवा मतदान कार्ड दाखवून जमा करा
नोटा जमा करण्यासाठी 10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबरपर्यंतची मुदत
30 डिसेंबरनंतर 500, 1000 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेत प्रतिज्ञापत्र देऊन बदलून घेणं शक्य. मात्र त्यासाठी 31 मार्चची मुदत
बुधवार 9 नोव्हेंबरला बँका आणि एटीएमही बंद
बँका बंद असल्या तरी ऑनलाइन प्रक्रियेद्वारे होणारे सर्व व्यवहार नेहमीप्रमाणेच सुरू
सरकारी रुग्णालयं आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर सध्या चलनात असलेल्या नोटा स्वीकारल्या जातील
500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा लवकरच चलनात येणार

 

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा