Advertisement

नरेंद्र मोदी- उद्धव ठाकरे यांची मुंबईत संयुक्त प्रचारसभा

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त प्रचारसभा मुंबईत होणार आहे.

नरेंद्र मोदी- उद्धव ठाकरे यांची मुंबईत संयुक्त प्रचारसभा
SHARES

राज्यभरात होणारी विधानसभा निवडणुकीला आता केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व उमेदवार जोरदार प्रचार करत आहेत. अशातच, विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजप-शिवसेना महायुतीची संयुक्त प्रचारसभा मुंबईत होणार आहे. ही प्रचारसभा शुक्रवारी होणार असून त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत.


वेगवेगळे प्रचार

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपची युती झाली असली तरी, दोन्ही पक्षाचे उमेदवार वेगवेगळे प्रचार करत आहेत. राज्यभरातील सर्व मतदारसंघातील मतदरांपर्यंत पोहोचण्यासाठीचा हा प्रयत्न अशल्याचं म्हटलं जात आहे. तसंच, महायुतीला २२० जागा मिळवण्याचं लक्ष्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठेवले आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या जागावाटपात भाजप १६४ तर शिवसेना १२४ जागा लढविणार आहे.  


मुंबईत सभा

शनिवारी प्रचाराचा शेवटचा दिवस असून त्याआधी शिरस्त्याप्रमाणं भाजप-शिवसेनेच्या सर्वोच्च नेत्यांची मुंबईत सभा होते. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वांद्रे-कुर्ला संकुलातील मैदानावर शुक्रवारी संध्याकाळी सभा होणार आहे. यावेळी मंचावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.



हेही वाचा -

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल

काँग्रेस सावरकरविरोधी नाही- मनमोहन सिंग



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा