Advertisement

काँग्रेस सावरकरविरोधी नाही- मनमोहन सिंग

वीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. यावरून काँग्रेस-भाजपात ठिणगी पेटलेली आहे.

काँग्रेस सावरकरविरोधी नाही- मनमोहन सिंग
SHARES

वीर सावरकर यांना भारतरत्न मिळावा म्हणून प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलं आहे. यावरून काँग्रेस-भाजपात ठिणगी पेटलेली असतानाच माजी पंतप्रधान आणि काँग्रेस नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी काँग्रेस सावरकरविरोधी नसल्याचं वक्तव्य केलं आहे.   

जाहीरनाम्यात आश्वासन

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने संकल्पपत्र जाहीर केलं आहे. या संकल्पपत्रात म. ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले आणि वीर सावरकर यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन दिलं आहे. या आश्वासनावर काँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. म. गांधी यांच्या हत्या प्रकरणात सावरकर यांचाही उल्लेख असल्याने, आपल्याला दोन्ही भूमिका तपासल्या पाहिजेत, असं दिग्वीजय सिंग म्हणाले. तर मनिष तिवारी यांनी सावरकरांना भारतरत्न मिळणार असेल तर नथुराम गोडसेला भारतरत्न का नाही?, असा प्रश्न उपस्थित केला. या पार्श्वभूमीवर मनमोहन यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.

काय म्हणाले मनमोहन सिंग?

काँग्रेसला सावरकर यांच्याबद्दल आदर आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वीर सावरकर यांच्या स्मरणार्थ पोस्ट तिकिटाचं अनावरण करून त्यांचा सन्मान केला होता. सावरकर हिंदुत्वाचे पुरस्कर्ते होते आणि काँग्रेस हिंदुत्वाच्या विचारधारेचं कधीही समर्थन करणार नाही. परंतु सावरकर यांना भारतरत्न देण्याची कुणाची मागणी असेल, तर भारतरत्न कुणाला द्यायचा, हे ठरवण्यासाठी एक समिती आहे आणि ही समितीच त्यावर निर्णय घेते, असं मनमोहन म्हणाले.

देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईत भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव कुठेही नव्हतं. त्यामुळे  काँग्रेसला कुणाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, असंही मनमोहन म्हणाले.



हेही वाचा-

वीर सावरकरांना भारतरत्न म्हणजे शहीद भगसिंगचा अपमान- कन्हैया कुमार

इंजिनदादा इंजिनदादा किती आवाज करता; भाजपची राज ठाकरेंवर टीका



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा