Advertisement

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन रूग्णालयात दाखल
SHARES

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती समोर येत आहे. यकृताच्या त्रासामुळं मागील ३ दिवसांपासून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. याआधी अमिताभ यांनी आपलं यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत असल्याचं स्पष्ट केलं होतं.

यकृताचा त्रास

मिळालेल्या माहितीनुसार, अमिताभ बच्चन यांना जास्त त्रास होऊ लागल्यानं मंगळवारी रात्री २ वाजताच्या सुमारास त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्यस्थितीत रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अमिताभ यांना रूग्णालयात दाखल करून ३ दिवस झाल्याचं बोललं जात आहे. 


२५ टक्केच कार्यरत

१९८२ साली ‘कुली’ चित्रपटादरम्यान अमिताभ बच्चन यांच्या यकृताला दुखापत झाली होतीत्यानंतर त्यांच यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत आहेत्यांना जेव्हा दुखापत झाली होती त्यावेळी ‘हेपेटाइटिस बी’ने ग्रस्त असलेल्या रूग्णाचं रक्त त्यांना चढवण्यात आलं होतं. सध्या त्यांच्या प्रसिद्ध गेस्ट्रोन्ट्रोलॉजिस्ट डॉ. बर्वे त्यांच्यावर उपचार करत आहेत. अमिताभ यांना रूग्णालयातील एका विशेष खोलीमध्ये ठेवण्यात आलं आहे.



हेही वाचा -

काँग्रेस सावरकरविरोधी नाही- मनमोहन सिंग

बँक येणार तुमच्या दारात, घरबसल्या मिळणार बँकिंग सुविधा



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा