Advertisement

देशभरात कोरोना महाराष्ट्र काँग्रेसमुळे पसरला - पंतप्रधान नरेंद्र मोदी

सुरूवातीच्या काळात कोरोना देशभरात पसरला, मात्र हा कोरोना महाराष्ट्रा कॉंग्रेसमुळं पसरला असल्याचं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

देशभरात कोरोना महाराष्ट्र काँग्रेसमुळे पसरला - पंतप्रधान नरेंद्र मोदी
SHARES

मुंबईसह देशभरात आलेल्या कोरोनाच्या महामारीमुळं अनेकांना आपला जीव गमवावा लागला. कोरोनामुळं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अर्थचक्र ठप्प झालं होते. शिवाय, अनेक परराज्यातील कामगारांनी आपल्या घरची वाट धरली. सुरूवातीच्या काळात कोरोना देशभरात पसरला, मात्र हा कोरोना महाराष्ट्रा कॉंग्रेसमुळं पसरला असल्याचं वक्तव्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मोदींनी एक तासाहून अधिक केलेल्या भाषणात काँग्रेसवर टीका आणि आरोपांचा भडिमार केला. 'कोरोनाच्या पहिल्या लाटेत देश लॉकडाऊचं पालन करत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते मात्र मुंबईच्या रेल्वे स्थानकांवर उभे राहून मुंबई सोडून जाणाऱ्या मजुरांना रेल्वेची तिकिटे देत होते. त्यांनी लोकांना स्थलांतरित होण्यासाठी प्रवृत्त केले', असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

'महाराष्ट्रावर असलेले परप्रांतीयांचे ओझे कमी होईल, तुम्ही इथून निघून जा, तुम्ही उत्तर प्रदेश, बिहारचे आहात, तिथे जाऊन कोरोना पसरवण्याचे काम करा, असा संदेश हे नेते देत होते. तुम्ही लोकांना राज्याबाहेर काढण्याचे मोठे पाप केले आहे. तुम्ही गोंधळाचे वातावरण निर्माण केले. तुमच्यामुळे कष्टकऱ्यांना असंख्य हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या. तुम्ही देशभर करोना पसरवला', असा आरोप मोदींनी केला.

पश्चिम बंगाल, तमिळनाडू, गोवा, ओडिशा, नागालँड अशा अनेक राज्यात मतदारांनी काँग्रेसला नाकारलं आहे, याचा उल्लेख करत त्यांनी काँग्रेसच्या पराभवांचा पाढा वाचला. तरीही काँग्रेसचा अहंकार जात नाही, अशी टीका त्यांनी केली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा