• 'पंतप्रधान मोदी मुंबईत फक्त भूमिपूजनासाठी येतात'
  • 'पंतप्रधान मोदी मुंबईत फक्त भूमिपूजनासाठी येतात'
SHARE

मुंबई - महापालिकेच्या निवडणुका जशा जवळ येत आहेत तशा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात. मनपा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महिन्यात मुंबईत वेगवेगळ्या योजनांचे भूमिपूजन केलं जाणार आहे. या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून टीका होते आहे. 'पंतप्रधान मुंबईत फक्त भूमिपूजनाचा कार्यक्रम करून जातात. पुढे त्या योजनेचं काहीचं होत नाही' अशी टीका काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे. तर मुंबईकर आता फक्त घोषणांवर अवलंबून राहणार नाहीत, नरेंद्र मोदी फक्त भूमिपूजन करण्यापुरते मुंबईत येत असतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे. भाजपाचे आमदार आणि प्रवक्ते मधू चव्हाण यांनी मुंबई लाइव्हला माहिती दिली की, 'इतकी वर्ष सत्ता मिळाल्यानंतर ज्या पक्षांनी काहीचं केलं नाही, अशा लोकांनी दुसऱ्यांवर बोलू नये. भाजपाच्या राजवटीतच खरा विकास होणार आहे,' असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या