पंतप्रधान मोदींनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी गुरूवारी दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

पंतप्रधान मोदींनी साधला मुख्यमंत्र्यांशी संवाद
SHARES

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी गुरूवारी दुपारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि गृहमंत्री अनिल देशमुख देखील उपस्थित होते.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बरोबर आठवड्याभरापूर्वी म्हणजेच २४ मार्च रोजी कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून देशभरात लाॅकडाऊनची (lockdown) घोषणा केली होती. परंतु तेव्हापासून सातत्याने देशभरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चाललेली पाहायला मिळत आहे. घराबाहेर पडू नका, प्रशासनाच्या नियमांचं पालन करा, सरकारने केलेलं आवाहन ९० टक्के जनता पाळत असली, तरी १० टक्के लोकं अजूनही बिनधास्तपणे रस्त्यावर निघत आहे. यामुळे कोरोनाविरोधीतील लढ्याला मोठा फटका बसत आहे. त्यातच एकाचवेळी हजारोंच्या संख्येने आपापल्या गावाकडे निघालेले मजूर तसंच दिल्लीतील मरकजच्या निमित्ताने निजामुद्दीनच्या मशिदीत थांबलेल्या हजारो मुस्लिम बांधवांनी तर या नियमांना हरताळच फासला. यामुळे सरकारची चिंता देखील वाढलेली आहे.

महाराष्ट्रात देखील कोरोनाबाधितांचा आकडा आता ३३५ वर जाऊन पोहोचला आहे. यावरच्या उपाय योजनांबाबत आधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. त्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधानांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत व्हिडिओ काॅन्फरन्सिगच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी राज्यातील परिस्थितीचा आढावा त्यांना देण्यात आला. या बैठकीनंतर महाराष्ट्रातील वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आणखी कडक पावलं उचलण्यात येतील, असं म्हटलं जात आहे.    


संबंधित विषय