निवडणुकीच्या तोंडावर मोदी मुंबईत

 Vidhan Bhavan
निवडणुकीच्या तोंडावर मोदी मुंबईत
Vidhan Bhavan, Mumbai  -  

नरिमन पॉईंट - नगरपालिकेवर आपला झेंडा फडकवल्यानंतर आता महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाने कंबर कसलीय. याच पार्श्वभूमीवर एमएमआरडीए अर्थात राज्य सरकार या महिन्यात 10 डिसेंबरला ठाणे आणि मुंबई मेट्रो 4 चे उदघाटन करणार आहेत. तसेच मुंबईत वायफाय फ्री सेवा सुरु करून मुंबईकरांना आकर्षित करण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरु आहे. याचे उद्घाटन खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते होणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकांच्या तोंडावर मोदींच्या हस्ते प्रचाराचा नारळ मोदींच्या हस्ते फोडण्याची भाजपानं तयारी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

Loading Comments