Advertisement

भुजबळांना 6 सप्टेंबरपर्यंत दिलासा


भुजबळांना 6 सप्टेंबरपर्यंत दिलासा
SHARES

बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहारप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना तुर्तास दिलासा मिळाला आहे. ईडीनं दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रानुसार 6 सप्टेंबरपर्यंत छगन भुजबळ यांच्यासह इतर 35 आरोपींना वैयक्तिक हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे.

भुजबळ यांची नाशिक येथील 25 कोटींची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करता येईल की नाही? यावर आता 6 सप्टेंबरला निर्णय होणार आहे.


ईडीची कारवाई

बेहिशेबी मालमत्ता आणि महाराष्ट्र सदन गैरव्यवहार प्रकरणी छगन भुजबळ यांच्या चौकशीनंतर त्यांची तुरुंगात रवानगी तुरुंगात करण्यात आली होती. यानंतर ईडीने भुजबळांच्या विविध मालमत्तांवर छापे टाकण्यास सुरुवात केली. या छापेमारीत भुजबळांची संपत्ती आणि मालमत्ता यांची माहिती समोर आली.


'स्वतंत्र गुन्हा नकोच'

आता भुजबळ यांच्या नाशिक येथील 25 कोटींची मालमत्ता जप्त करत ईडीने याप्रकरणी पीएमएलए कोर्टात पुरवणी आरोपपत्र दाखल केलं आहे. मात्र याप्रकरणी स्वतंत्र गुन्हा दाखल करता येणार नाही, असा दावा छगन भुजबळ यांच्यावतीने करण्यात आला आहे.


हेही वाचा - 

छातीत दुखू लागल्याने छगन भुजबळ रुग्‍णालयात

छगन भुजबळांचा महाराष्ट्र सदन घोटाळा काय अाहे? इथे वाचा

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा