Advertisement

संदीप देशपांडे हल्लाप्रकणातील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

हल्ला करणारे संशयित सीसीटीव्हीत कैद झाले होते. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

संदीप देशपांडे हल्लाप्रकणातील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात
SHARES

मनसे सरचिटणीस आणि प्रवक्ते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande ) यांच्यावर शुक्रवारी दादर शिवाजी पार्क येथे हल्ला करण्यात आला होता. यात ते थोडक्यात वाचवले. त्यांच्या हात आणि पायाला दुखापत झाली. (Attack on MNS leader Sandeep Deshpande )

हल्ला करणारे संशयित सीसीटीव्हीत कैद झाले होते. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. संदीप देशपांडे मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांच्यावर स्टम्पने  जीवघेण्यात हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्ल्याचा देशपांडे यांनी प्रतिकार केला. त्यानंतर हल्लेखोर तेथून पळून गेले होते. 

संदीप देशपांडे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर (Sandeep Deshpande Attack ) ते जखमी झाले. त्यांना हिंदुजा रुग्णालयाद दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.

दरम्यान, यावेळी पोलिसांनी त्यांचा जबाब नोंदवला होता. त्यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यावर संशय व्यक्त केला होता.

हल्ला करणारे संशयित सीसीटीव्हीत चित्रित झाल्याचे आढळून आले होते. त्यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या हल्लाप्रकरणी भांडुपमधून दोन जणांना गुन्हे शाखेने ताब्यात  घेतले आहे. दोघे भांडुप पश्चिम येथील रहिवासी असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

देशपांडे यांच्यावर झालेला हल्ला हा नियोजित होता. तसेच राजकीय हल्ला असण्याची शक्यता मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray ) आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करावी. लगेच आरोपी सापडतील, असा दावा आरोप करताना मनसे नेते अमेय खोपकर (Amey Khopkar) यांनी केला आहे.

आपण असा हल्ल्याला घाबरणार नाही. मी माझे काम करत राहणार, अशी प्रतिक्रिया हल्ल्यानंतर संदीप देशपांडे यांनी दिली आहे. हल्ला कोणी केला आहे, हे मी पोलिसांना सांगितले आहे, असेही ते म्हणाले.

दरम्यान, या हल्ल्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. असा हल्ला कोणावरही होणे चुकीचे आहे. 


हेही वाचा

Mumbai Local News : वंदे भारतासारखी वंदे लोकल लवकरच मुंबईत धावणार

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा