• नगरसेवक मोहसिन हैदर दुसऱ्या पक्षाच्या वाटेवर?
SHARE

अंधेरी - काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता अजून चव्हाट्यावर आला आहे. अंधेरीच्या वॉर्ड 66 मध्ये सध्या नगरसेवकपदावर असलेले मोहसिन हैदर यांचा पत्ता कट करण्याचा प्रयत्न काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांनी सुरू केले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक जाधव यांच्या आमदारकीच्या उमेदवारीला मोहसिन हैदर भविष्यात डोकेदुखी ठरू शकते. त्यामुळे अशोक जाधव यांनी जिल्हास्तरावरून इच्छुक उमेदवार आणि जिंकण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांमध्ये मोहसिन हैदर यांचे नाव पुढे पाठवलं नाही. अशोक जाधव यांच्यामुळे त्रस्त झालेले मोहसिन हैदर यांनी याबाबत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनाही तक्रार केली आहे.

'मुंबईत सर्वात जास्त मते घेणाऱ्या नगरसेवकांचे तिकीट कट करण्याचे कारस्थान सुरू आहे, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडे 1 फेब्रुवरीपर्यंतची वेळ दिली आहे, त्यांनंतर कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढील वाटचाल ठरवणार' अशी माहिती मोहसिन हैदर यांनी ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना दिली.

याबाबत काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की तिकीट देण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार फक्त मुंबईतील काँग्रेस जेष्ठींना आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप चुकीचे आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या