Advertisement

या समाजसेवेमागे दडलंय काय?


SHARES

मुंबई - कुणी पाणी वाटतय, तर कुणी चहा बिस्किट...ही परिस्थिती आहे मुंबईच्या बँकांच्या बाहेर.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1000-500 च्या नोटा रद्द केल्याची घोषणा केली आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. प्रत्येक जण आपल्याकडील जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकामध्ये धाव घेऊ लागलेत. दिवसेंदिवस लोकांची बँकामध्ये गर्दी वाढू लागली. लोकांना होणार त्रास यामुळे राजकीय लोक मदतीसाठी पुढे येऊ लागलेत. आणि हीच आपल्यासाठी राजकीय लाभ मिळवण्याची नामी संधी असल्याचे राजकारण्यांच्या लक्षात आलं आणि सुरू झालं समाजसेवेचं राजकीय नाट्य. लोकांच्या मदतीसाठी सगळेच पक्ष सरसावू लागेल. चारकोपमध्ये विभाग प्रमुख अभिजीत अडसूळ यांच्या आदेशानंतर बँकांच्या बाहेर पाणी वाटप करण्यात आलं. तर खार पूर्वमध्ये नगरसेवक महेश पारकर यांच्याहस्ते चहा आणि पाणी वाटप करण्यात आलं. या सगळ्यात मग मनसे तरी कशी मागे राहिलं. वरळी आणि लोअर परळमध्ये तर मनसे उपाध्यक्ष संजय जामदार यांच्यावतीनं नागरिकांसाठी पाण्याची आणि बसण्याची व्यवस्था करण्य़ात आली. एवढचं नाही तर अरूण दुधवडकर यांच्याहस्ते सी-वॉर्ड परिसरा आणि दादरमधील जी नॉर्थ परिसरातून आमदार सदा सरवणकर यांच्याहस्ते पाणी वाटप करण्यात आलंय. मात्र राजकीय नेत्यांच्या या सहानभूतीचं काहींनी कौतूक केलंय तर काहींनी निवडणुकीसाठी चाचलेली नाटकं असल्याची प्रतिक्रीया दिलीय.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा