Advertisement

संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा

चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते.

संजय राठोड यांचा मंत्रीपदाचा राजीनामा
SHARES

पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात अखेर वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिला आहे. राठोड यांनी वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपला राजीनामा सादर केला आहे. 

चर्चगेटमधील छेडा सदन निवासस्थानाहून दुपारी अडीचच्या सुमारास संजय राठोड पत्नी शीतल आणि मेहुणे सचिन नाईक यांच्यासह वर्षा बंगल्यावर गेले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज संध्याकाळी ५.३० वाजता सह्याद्री अतिथीगृहावर मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वीच राठोड यांनी आपला राजीनामा सादर केला. 

बीड जिल्ह्यातील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात आत्महत्या केली होती. या प्रकरणात नाव समोर आल्यानंतर वनमंत्री संजय राठोड अडचणीत आले होते. पूजा चव्हाणसोबतचे फोटो आणि या प्रकरणाशी संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर भाजपाने संजय राठोड यांच्यावर आरोप करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. 

संजय राठोड यांचा राजीनामा घेतला नाही तर अधिवेशन चालू देणार नसल्याचा इशाराही भाजापाने दिला होता. तसंच संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा यासाठी शनिवारी राज्यभरात आंदोलन करण्यात आलं होतं.

दरम्यान, पोहरादेवीच्या महंतांनी पुन्हा एकदा राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचं म्हटलं आहे. कोणत्याही चौकशीशिवाय राठोड यांचा राजीनामा घेऊ नये, असं आवाहन महंतांनी मुख्यमंत्र्यांकडे केलं होतं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
POLL

आज रोहीतची पलटन हैदराबादला पहिल्या विजयापासून रोखू शकेल का ?
Submitting, please wait ...
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा