Advertisement

लोकल प्रवासासाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकरांना टीसीने दंड ठोठावला

सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी मुंबईत भाजपा नेत्यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर आंदोलनास सुरूवात झाली आहे.

लोकल प्रवासासाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकरांना टीसीने दंड ठोठावला
SHARES

मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असून, सर्व व्यवहार आता सुरळीत सुरू झाले आहेत. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारनं नवी नियमावली आखत राज्यातील अनेक जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल केले. त्यामुळं आता मुंबई लोकलही सुरू करावी अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांसाठी मुंबई लोकल सुरू व्हावी या मागणीसाठी मुंबईत भाजपा नेत्यांच्या नेतृत्वात ठिकठिकाणी रेल्वे स्थानकांवर आंदोलनास सुरूवात झाली आहे.

चर्चगेट स्टेशन बाहेर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात तर कांदिवलीमध्ये भाजपा आमदार अतुल भातखळकरांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू झालं आहे. दरम्यान, लोकलसाठी आंदोलन करणाऱ्या प्रवीण दरेकरांना टीसीने २६० रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी 'मला २६० रुपयांचा दंड ठोठावला आहे. मी टीसीकडे टीकीटाची मागणी केली तर लोकल ट्रेन सेवा अद्याप सुरू झालेली नाही, असे टीसी म्हणाला', असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.

मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सामान्य नागरिकांना प्रवास करण्याची मुभा मिळावी आणि लोकल प्रवासाला परवानगी न देण्याच्या विरोधात मुंबई भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. याप्रसंगी भाजपा नेते व कार्यकर्त्यांकडून महाविकासआघाडी सरकारविरोधात घोषबाजी करण्यात येत आहे. तर, या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्वच ठिकाणी मोठ्याप्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आल्याचे दिसत आहे. शिवाय, भाजपाच्या काही कार्यकर्त्यांना देखील ताब्यात घेतलं गेलं आहे. चर्चगेट, दहिसर घाटकोपर या ठिकाणी आंदोलनास सुरूवात झाली आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा