Advertisement

युतीचा पोपट जिवंत! युतीसाठी आता मोदींचा पुढाकार, २३ जानेवारीला मोदी मुंबईत

युती गेली खड्ड्यात आधी शेतकर्यांसाठी काय करणार ते सांगा असं म्हणत दोन दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीत रस नसल्याचं म्हटलं होतं.

युतीचा पोपट जिवंत! युतीसाठी आता मोदींचा पुढाकार, २३ जानेवारीला मोदी मुंबईत
SHARES

युती गेली खड्ड्यात आधी शेतकर्यांसाठी काय करणार ते सांगा असं म्हणत दोन दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी युतीत रस नसल्याचं म्हटलं होतं. तर भाजपा-शिवसेना युतीचा पोपट मेला असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला होतं. या दोन्ही वक्तव्यांमुळे युतीच्या चर्चेला आता लवकरच पूर्णविराम लगणार अशी चर्चा होती. मात्र गुरूवारी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका कार्यक्रमात दहिहंडीत अनेक थर असतात. युतीच्या चर्चेत आम्ही कुठं आहोत हे शुक्रवारच्या दिल्लीतील बैठकीत ठरेल, अंस वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे युतीचा पोपट जिवंत असल्याचं पुन्हा एका स्पष्ट झालं आहे.

महत्त्वाचं म्हणजे युती करण्यासाठी आता स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढाकार घेत उद्धव ठाकरे यांच्याशी युतीसाठी चर्चा करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यासाठी मोदी लवकरच मुंबईत येणार असल्याचीही माहिती पुढं येत आहे.


भाजपा-सेनेत तु तु मैं मैं

काँग्रेस-राष्ट्रवादीचं सुत जुळलं असून हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या तयारीलाही लागले आहेत. मात्र दुसरीकडे लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या तरी भाजपा-शिवसेनेचं युतीच गुर्हाळ सुरूच आहे. भाजपा युतीची साद घालत आहे, पण सेनेकडून त्याला कुठलाच प्रतिसाद मिळताना दिसत नाही. त्यामुळेच कंटाळलेल्या भाजपानं शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट न बघता निवडणुकीच्या तयारी लागण्याचे आदेश नेत्यांना-कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजपा अध्यक्ष अमित शाह यांनी तर लातुरच्या सभेत युती झाली तर ठिक नाही तर विरोधकांप्रमाणे मित्रपक्षांनी पटकवण्याची भाषा करत शिवसेनेला इशारा वजा धमकी दिली होती. त्यानंतर भाजपा-सेनेतील वाद आणखी वाढला नि उद्धव ठाकरे यांच्यासह राऊत यांनी युतीत सेनेला रस नसल्याचं वक्तव्य केलं होतं.


मोदी २३ जानेवारी मुंबईत?

पण आता मात्र आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे युतीच्या चर्चा पुन्हा रंगणार हे नक्की. शुक्रवारी दिल्लीत भाजपा कार्यकारणीची बैठक असून या बैठकीत मित्रपक्षांशी युती करण्यासंबंधी चर्चा होणार आहे. तर युतीसाठी मित्रपक्षांसमोर अनेक प्रस्ताव ठेवले जाण्याची शक्यता आहे. त्यानुसार सेनेला जवळ करण्यासाठी समृद्धी महामार्गाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. २३ जानेवारीला, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मोदी मुंबईत येण्याची चर्चा आहे. यावेळी मोदी-उद्धव ठाकरे यांच्यात युतीबाबत चर्चा होईल आणि युतीच भवितव्य ठरेल असं म्हटलं जात आहे.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा