खड्डे कधी बुजवणार?

Andheri
खड्डे कधी बुजवणार?
खड्डे कधी बुजवणार?
खड्डे कधी बुजवणार?
खड्डे कधी बुजवणार?
See all
मुंबई  -  

अंधेरी - आश्वासन देऊनही पालिकेने खड्डे बुजवण्याच्या कामाला अजून सुरुवात न झाल्याने जिल्हा कांग्रेस कमिटी यांच्या वतीने शनिवारी धरणे प्रदर्शन करण्यात आलं. माजी विरोधी पक्षनेते आणि नगरसेवक देवेंद्र आंबेकर यांनी गुरुदास कामत यांच्या आदेशानुसार शनिवारी धरणे प्रदर्शन केले. प्रभाग क्रमांक 57 या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना ये-जा करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कॅप्टन सुरेश सावंत मार्ग वीरा देसाई रोड, एस व्ही रोड, जे पी रोड, मस्जिद रोड या मार्गावर पडलेले खड्डे 15 दिवसात बुजवण्यात येणार असल्याचे आश्वासन पालिकेनं दिलं होतं. मात्र 15 दिवसाचा कालावधी उलटून गेल्यानंतरही परिस्थिती जैसे थेच आहे.

शिवसेना आणि बीजेपी यांचा महापालिका प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचं नगरसेवक आंबेकर म्हणाले. या वेळी त्यांनी खड्ड्यांमध्ये झाड लावून निषेध करत लवकरात लवकर या मार्गावरील सर्व रस्त्यावर डाबरीकरण करण्याची मागणी के पश्‍चिम विभागाकडे केली.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.