'जल्लीकट्टू'साठी धारावीत तामिळ विद्यार्थ्यांचे आंदोलन

 Mumbai

See all

धारावी - 90 फूट रस्त्यावर अमेरिकन एनजीओ पेटा विरोधात तामिळ विद्यार्थी संघटनेच्या वतीने बुधवारी मूक आंदोलन करण्यात आले. सांस्कृतिक परंपरा म्हणून लाभलेल्या जल्लीकट्टू (बैलाशी झुंज) खेळावरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवावी, अशी आंदोलकांची मागणी होती. दरम्यान शेकडो विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन पेटाचा निषेध केला.

तामिळनाडूमध्ये बैलाशी झुंज करण्याच्या जल्लीकट्टू सणाला 2000 वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे हा खेळ पोंगल सणाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. आमच्या प्राचीन सांस्कृतिक परंपरेवर आक्षेप घेण्याचा अधिकार पेटाला कोणी दिला? असा प्रश्न या वेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

Loading Comments