Advertisement

आदिवासी मंत्र्यांच्या विरोधात मोर्चा


आदिवासी मंत्र्यांच्या विरोधात मोर्चा
SHARES

गोरेगाव - गोरेगाव पूर्व आरे कॉलनीत अनुसूचित जमातीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. पालघर येथील कुपोषित बालक मृत्यूनंतर आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याविरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी विष्णू सावरा यांच्या पुतळ्याला चपलांचा हार घालून निषेध करण्यात आला.

मुंबई काँग्रेसच्या अनुसूचित जमाती विभागाचे अध्यक्ष सुनील कुमरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला अंकुश भोईर, सुरेश लाखान, चंद्रेश भोईर, चंद्रकांत वाळके, राज प्रजापती, विजय पाडवी, अंजली भावर, किशन चौधरी, रमेश किरकिंरे, कृष्णा दळवी आदी उपस्थित होेते.

संबंधित विषय
Advertisement