• खेरवाडीत राष्ट्रवादीचा धडक मोर्चा
  • खेरवाडीत राष्ट्रवादीचा धडक मोर्चा
  • खेरवाडीत राष्ट्रवादीचा धडक मोर्चा
  • खेरवाडीत राष्ट्रवादीचा धडक मोर्चा
  • खेरवाडीत राष्ट्रवादीचा धडक मोर्चा
  • खेरवाडीत राष्ट्रवादीचा धडक मोर्चा
SHARE

वांद्रे - राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खेरवाडी ते उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर नोटबंदीच्या विरोधात विशाल मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर, प्रवक्ते नवाब मलिक, विद्या चव्हाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी झाले होते.

नोटबंदीचा सगळ्यांनाच त्रास झाला आहे. मात्र याचा जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी योजना कराव्यात असे आवाहन सुनील तटकरे यांनी केले. यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन देत शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या.

संबंधित विषय
ताज्या बातम्या