Advertisement

वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

कोस्टल रोड प्रकल्पाला विरोध असलेल्या वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांनी फटका बसण्याची चिन्हे आहेत.

वरळी कोळीवाड्यातील मच्छिमारांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार
SHARES

कोस्टल रोड प्रकल्पाला विरोध असलेल्या वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांनी लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं दक्षिण मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांनी फटका बसण्याची चिन्हे आहेत.  


मतदानावर बहिष्कार 

'मनपा प्रस्तावित कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत समुद्र किनाऱ्यालगत २०० ते ५०० मीटर किंवा अधिक भराव टाकला जात आहे. हा केवळ किनारी रस्ता नसून, गाडी पार्किंग, गार्डन व रस्ता यासाठी मातीचा भराव टाकून समुद्र गिळून टाकत आहे. त्यामुळं कोळी समाज व त्यांचा व्यवसाय देशोधडीला लागणार आहे. वरळी कोळीवाड्यात पावसाळ्यात व भरतीच्यावेळी समुद्राचं पाणी गावात शिरून घरं नष्ट होण्याची शक्याता आहे', अशा शब्दांत नाराजी व्यक्त करत कोळीबांधवांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याच निर्णय घेतला आहे.


म्हणून 'ही' भूमिका घेतली

वरळी कोळीवाड्यामध्ये तब्बल ४० हजारांच्या घरात मतदार असतील. कोस्टल रोड प्रकल्पाबाबत न्यायालयाचं दार ठोठावून देखील राजकीय पक्षांनी न्याय दिला नाही. त्यामुळं ही भूमिका घेण्याची वेळ आली, असं देखील भूमिका कोळी बांधवांनी स्पष्ट केली आहे.


अरविंद सावंतांना फटका

गेली अनेक वर्ष वरळी कोळीवाड्यातील मच्छिमार बांधवांच्या मतदानाचा कौल शिवसेनेच्या बाजून लागतं आहे. परंतु, आता कोळीबांधवांनीच मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतल्यानं सेना-भाजप महायुतीचे उमेदवार अरविंद सावंत यांना मोठा फटका बसण्याची शक्याता वर्तवली आहे. दरम्यान, दक्षिण मुंभई मतदारसंघातून सावंत यांच्याविरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी महाआघाडीतर्फे मिलिंद देवरा रिंगणात आहेत.



हेही वाचा -

सिनेमानंतर आता मोदींची वेब सिरिजही ‘ऑफलाईन’

'राज ठाकरेंच्या सभा म्हणजे निव्वळ टाईमपास'- विनोद तावडे



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा