राहुल शेवाळे किरीट सोमय्यांवर कडाडले

  Mumbai
  राहुल शेवाळे किरीट सोमय्यांवर कडाडले
  मुंबई  -  

  दादर - शिवसेना-भाजपाची युती संपुष्टात आल्याने दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यात. भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांनी पालिकेच्या भ्रष्ट कारभारावर जोरदार टीका केली. त्याला शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी प्रत्युत्तर दिले.

          काय म्हणालेत राहुल शेवाळे

  • किरीट सोमय्या यांना महापालिकेचे कामकाज कसे चालते हे माहीत नाही
  • ज्या पालिकेच्या कारभारावर किरीट सोमय्या टीका करतात त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांची देखील आहे.
  • आमच्यावर टँकर माफियाचे आरोप करणारे स्वत: टँकरमाफिया
  • 150 रुपयाला पाण्याचा टँकर घेऊन 1000 हजार रुपयाला किरीट सोमय्यांच्या कार्यकर्त्यांनी विकल्याचा आरोप
  • आकृती बिल्डरला जागा देण्याचा किरीट यांच्यावर आरोप
  • भाजपाची सत्ता असलेल्या पालिकांवर एसीबीची कारवाई
  • पारदर्शकतेच्या नावाखाली भाजपा जनतेची दिशाभूल करतेय
  • पालिकेतील अनेक कंत्राटदारांचे भाजपाशी आणि आरएसएसशी संबंध
  • निर्मल भारत अंतर्गत केलेल्या कामातील घोटाळा, स्वच्छतागृह आणि मिठीनदीतील घोटाळा खासदार किरीट सोमय्या यांच्या काळात झाला.
  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.