सलमानला चपराक

  Dadar
  सलमानला चपराक
  मुंबई  -  

  पाकिस्तान कलाकारांची पाठराखण केल्याबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी अभिनेता सलमान खानचा समाचार घेतलाय. सलमानला जर पाकिस्तानी कलाकारांबद्दल इतकं प्रेम वाटत असेल तर त्याने तिथलं वर्क परमिट काढावं आणि पाकिस्तानात जाऊन तिथेच काम करावं, अशा शब्दांत राज ठाकरेंनी सलमानवर निशाणा साधला आहे. सलमानला पाकिस्तानी कलाकारांचा एवढा पुळका असेल तर त्यानं पाकिस्तानमध्ये जाऊन शूटिंगही करावं, असाही सल्ला राज ठाकरेंनी दिला. मुंबईतील पत्रकार परिषदेत त्यांनी सलमानवर टीकास्त्र सोडले.

  कलाकार आभाळातून पडतात का? ज्या कलाकारांना स्वत:च्या देशासाठी उभं राहता येत नाही, त्या कलाकारांना पाकिस्तानात तरी किंमत मिळेल का? सलमानला पाकिस्तानी कलाकारांबद्दल एवढं प्रेम वाटतं ना? मग तेवढं प्रेम देशाबद्दल का नाही वाटत? देशासाठी लढताना जे जवान शहीद झाले त्यांच्याबद्दल का काही बोलत नाही? उद्या याच जवानांनी शस्त्र खाली ठेवली तर सलमान सीमेवर लढायला जाणार आहे का? असे प्रश्न राज यांनी उपस्थित केले.

  पाकिस्तानी कलाकार खबरी नसतील कशावरून?

  सलमान खान म्हणतो पाकिस्तानी कलाकार म्हणजे दहशतवादी नाहीत. पण मग ते कलाकार माहिती पुरवत नसतील किंवा खबरी नसतील कशावरून, असा सवालही राज यांनी विचारला.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.