SHARE

देशात निवडणुकांशिवाय धंदा नाही. एक गेली की दुसरी येते अशी टीका राज ठाकरेंनी केली आहे. कोपर्डीत झालेल्या अत्याचार प्रकरणावर जाती-धर्म निहाय कायदे कशासाठी हवेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला. यशवंतराव नाट्यगृहात झालेल्या मनसेच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. तर उत्तर प्रदेशात होणा-या निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन नरेंद्र मोदींनी 'गोळ्या मारायच्या असतील तर मला मारा' असे भावनिक आव्हान केले आहे. अशी जोरदार टीकाही त्यांनी केली 

संबंधित विषय
ताज्या बातम्या