Advertisement

राजगृह तोडफोड: हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला- मनसे

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं दादरच्या हिंदू काॅलनीतील राजगृह निवासस्थानाची मंगळवारी उशीरा रात्री काही अज्ञात व्यक्तींकडून नासधूस करण्यात आली. हा प्रकार म्हणजे महाराष्ट्रधर्मावरील हल्ला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिली आहे.

राजगृह तोडफोड: हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला- मनसे
SHARES

भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं दादरच्या हिंदू काॅलनीतील राजगृह निवासस्थानाची मंगळवारी उशीरा रात्री काही अज्ञात व्यक्तींकडून नासधूस करण्यात (raj thackeray's maharashtra navnirman sena criticizsd stone pelting on dr br ambedkar house rajgruha) आली. हा प्रकार म्हणजे महाराष्ट्रधर्मावरील हल्ला असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिली आहे. 

आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर या प्रकारावर व्यक्त होताना, हा आमच्या प्रज्ञास्थळावर हल्ला... हा महाराष्ट्रधर्मावरचा हल्ला... ह्या भ्याड कृत्याचा निषेध करावा तितका कमीच पण सरकारने आणि मराठी समाजाने अशा समाजविषाणूंना समूळ नष्ट करण्यासाठी आता कृतिशील व्हावं, अशी प्रतिक्रिया नोंदवली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील दादर, हिंदू कॉलनी इथं राजगृह निवासस्थान आहे. या निवासस्थानावर मंगळवारी उशीरा रात्री काही अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये २ अज्ञात व्यक्ती इमारतीच्या आवारात शिरल्याचं दिसत आहे. इमारतीच्या आवारात शिरल्यावर घराबाहेरील कुंड्यांची आणि घरांच्या काचांची तोडफोड त्यांनी केली. एवढंच नाही तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. 

हेही वाचा - Ajit Pawar: ‘राजगृह’ तोडफोडीची शासनाकडून गंभीर दखल- अजित पवार

त्यावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं राजगृह निवासस्थान महाराष्ट्रातील तमाम जनतेचं तीर्थक्षेत्रच आहे. त्यामुळे राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही, असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचं राजगृह निवासस्थान महाराष्ट्रातील तमाम जनतेचं तीर्थक्षेत्रच आहे. त्यामुळे राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. पोलिसांना दोषींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे.

ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचं श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तूत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे. राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलिसांना दिले आहेत, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

तर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील ऐतिहासिक महत्त्वाच्या ‘राजगृह’ निवासस्थानी झालेली तोडफोडीची घटना अत्यंत निषेधार्ह असून हे समाजविघातक विकृत मानसिकतेचं दुष्कृत्य आहे. राज्य शासनाने घटनेची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून तपासकार्य सुरु केलं आहे. आरोपींना लवकरात लवकर शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. नागरिकांनी असे दुष्कृत्य करणाऱ्या समाजविघातक शक्तींच्या वाईट हेतूला बळी पडू नये. शांतता, संयम पाळावा, एकजूट कायम ठेवावी, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा