Advertisement

कब्रस्तानच्या शिलेवरील राज ठाकरेंच्या नावाला अज्ञातांनी फासलं काळं

२०१३ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते कोंढवा इथल्या नुराणी कब्रस्तानमदील सुविधांचे लोकार्पण झाले होते.

कब्रस्तानच्या शिलेवरील राज ठाकरेंच्या नावाला अज्ञातांनी फासलं काळं
SHARES

गुढीपाडव्याच्या मेळाव्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका मांडली होती. त्यांनी यावेळेस मशिदींवरील भोंग्यांना विरोध करण्यापासून मदरश्यांवर तसंच मशिदींवर छापे टाकण्यासंदर्भातील वक्तव्य केली होती. पण मनसेमध्येच राज यांच्या या वक्तव्यावरुन दुमत असल्याचं चित्र दिसत आहे.

पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी राज यांच्या या भूमिकेनंतर राजीनामा दिला. आता पुण्यातील कोंढावा इथं राज यांनी उद्घाटन केलेल्या एका कब्रस्तानामधील शिलेवरील त्यांचे नाव काढून टाकण्यात आले आहे.

२०१३ साली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते कोंढवा इथल्या नुराणी कब्रस्तानमदील सुविधांचे लोकार्पण झाले होते, असं म्हटलं जातंय. पण राज ठाकरे यांनी नुकत्याच घेतलेल्या आपल्या नव्या राजकीय भूमिकेमुळे मुस्लिम समाजामध्ये नाराजी पसरली आहे.

आपल्या भाषणामध्ये राज यांनी मशिदींबरोबर अजान आणि मुस्लीम समाजाचा अपमान केल्याचा दावा करत अज्ञातांनी या कब्रस्तानामधील विकासकामांच्या उद्घाटन शिलेवरील राज यांच्या नावाला काळे फासले आहे.

दरम्यान, पुणे शहर मनसेकडून शहरातील पोलीस ठाण्यांना पत्र पाठवलं आहे. डेक्कन परिसरातील सर्व मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढण्याबाबत मनसेनं पत्र दिलं आहे. याबाबत विश्रामबाग, फरासखाना पोलीस ठाण्यालाही मनसेनं पत्र दिल आहे.

''चार दिवसात मशिदीवरील अनधिकृत भोंगे काढा, अन्यथा दुप्पट पटीने स्पीकर लावून हनुमान चालीसाचे पठण करणार,'' असा इशारा मनसेनं दिला आहे.



हेही वाचा

राज ठाकरेंच्या भोंग्या संदर्भातील वक्तव्यानंतर मनसेच्या मुस्लिम पदाधिकाऱ्याचा राजीनामा

महागाईविरोधात काँग्रेसचा ७ एप्रिलला मोर्चा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा