Advertisement

... म्हणून राज ठाकरेंनी केले जावेद अख्तर यांचे कौतुक

मला जावेद अख्तर यांच्यासारखा मुस्लिम हवा, असे का म्हणाले राज ठाकरे?

... म्हणून राज ठाकरेंनी केले जावेद अख्तर यांचे कौतुक
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत शिवाजी पार्कवर पार पडलेल्या पाडवा मेळाव्यातून हिंदुत्वाबाबतही आपली भूमिका मांडली. त्यासाठी त्यांनी थेट जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन दहशतवादाबाबत मांडलेल्या भूमिकेचाही संदर्भ दिला. “मला धर्मांध हिंदू नकोय, मला धर्माभिमानी हिंदू हवाय”, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

“मला लोकांनी विचारलं, तुमची हिंदुत्वाची व्याख्या काय? हिंदू म्हणून तुम्ही कुणाला बघता? मी म्हटलं मला धर्मांध हिंदू नकोय. मला धर्माभिमानी हिंदू हवाय. जो दुसऱ्याच्या धर्माचाही मान राखेल. मला माणसं हवी आहेत. मुस्लीम धर्मातलीही माणसं मला हवी आहेत. पण ती माणसं जावेद अख्तरांसारखी असायला हवीत”, असं राज ठाकरे म्हणाले.

“या देशातल्या कोणत्याही नागरिकानं पाकिस्तानमध्ये जाऊन आजपर्यंत खडे बोल सुनावले नाहीयेत. द्वेषानं बघण्यासारखं समोर काहीही नसतं. पण जिथे कुरापती काढत असतील, त्यांना त्याच पद्धतीचं उत्तर द्यायला हवं”, असं म्हणत राज ठाकरेंनी जावेद अख्तर यांच्या त्या कृतीचं कौतुक केलं.

“मला अपेक्षित असलेला मुसलमान कसा असला पाहिजे? पाकिस्तानला सुनावणारा, तशी हिंमत असणारा मुसलमान मला पाहिजे. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन त्यांना सुनावलं आहे. तिथे त्यांच्या लोकांसमोर जाऊन त्यांना सांगायचं की आमच्या शहरावर झालेला हल्ला आम्ही विसरणार नाही. अशी माणसं मला अपेक्षित आहेत”, असं राज ठाकरेंनी यावेळी नमूद केलं.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा