Advertisement

चूक नसेल, तर घाबरण्याचं कारण काय? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला

ईडी ही स्वतंत्र संस्था असून तिचा भाजपाशी कुठलाही संबंध नाही. राज यांची कुठलीही चूक नसेल, तर त्यांनी न घाबरता चौकशीला सामोरं गेलं पाहिजे., असं मुख्यमंत्री म्हणाले.

चूक नसेल, तर घाबरण्याचं कारण काय? मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना टोला
SHARES

“मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेल्या ईडीच्या नोटिशीबद्दल मला काहीच माहिती नाही. ईडी ही स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे राज ठाकरे यांची चूक नसेल, तर घाबरायचं काहीच कारण नाही.”, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलं. 

भाजपाची संबंध नाही

राज ठाकरे यांना कोहिनूर क्वेअर प्रकरणात ‘ईडी’कडून पाठवण्यात आलेली नोटीस ही राजकीय हेतूने पाठवण्यात आल्याचा सरकारवर आरोप होत आहे. या आरोपासंदर्भात मुख्यमंत्र्यांना विचारणा केली असता, ते म्हणाले की, “राज यांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आल्याचं मी देखील प्रसार माध्यमातूनच ऐकलं आहे. त्यांना नोटीस कशाबद्दल पाठवण्यात आली हे मला ठाऊक नाही. ईडी ही स्वतंत्र संस्था असून तिचा भाजपाशी कुठलाही संबंध नाही. राज यांची कुठलीही चूक नसेल, तर त्यांनी न घाबरता चौकशीला सामोरं गेलं पाहिजे. त्यांनी योग्य उत्तरं दिली, तर त्यांना काहीही होणार नाही.”

कडक कारवाई करणार

ईडीच्या नोटीशीवरून सरकारचा निषेध करण्यासाठी २२ आॅगस्ट रोजी मनसे ठाण्यात बंद पुकारणार आहे. याबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारल्यावर ते म्हणाले, कार्यकर्ते कुठल्याही पक्षातील असोत, जे कायदा हातात घेतील, त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अशा इशाराही त्यांनी दिला. 



हेही वाचा-

राज यांना पाठवलेली ईडीची नोटीस सूडबुद्धीनेच- बाळासाहेब थोरात

अशा नोटिशींना मनसे भीक घालत नाही- संदीप देशपांडे



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा