Advertisement

राज ठाकरेंविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्यात आलंय.

राज ठाकरेंविरोधात नॉन बेलेबल वॉरंट जारी
SHARES

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray News) यांच्याविरोधात वॉरंट जारी (Raj Thackeray Warrant issued) करण्यात आलंय. ६ एप्रिल रोजी हे वॉरंट राज ठाकरे यांच्याविरोधात जारी करण्यात आलेलं होतं. मात्र त्यांच्यावर अद्याप कारवाई का करण्यात आली नाही, असं प्रश्न कोर्टानं आता पोलिसांना उपस्थित केला आहे.

सांगली जिल्ह्यातील शिराळा कोर्टाकडून (Shirala Court) राज ठाकरेंना वॉरंट जारी करण्यात आलं होतं. २८ एप्रिल २०२२ रोजी जारी करण्यात आलेलं हे पत्र आता समोर आलं आहे. राज ठाकरेंवर १४३, १०९, ११७ अशी कलमं लावण्यात आली आहे.

२००८ सालच्या एका प्रकरणात राज ठाकरेंविरोधात हे वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. विशेष म्हणजे राज ठाकरेंविरोधात जारी करण्यात आलेलं वॉरंट हे अजामीनपात्र आहे. त्यामुळे राज ठाकरेंना या वॉरंटमुळे कोणत्याही प्रकारचा जामीन मिळण्याची शक्यता नाही. शिराळ्यातील न्यायदंडाधिकाऱ्यांनी हे वॉरंट जारी केलं आहे.

दहापेक्षा जास्त वर्ष जुनं असलेल्या या प्रकरणात आता विशेष हवालदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. अनावश्यक गर्दी करण्यासोबत इतरही अनेक कायद्यांचं उल्लंघन केल्याचा आरोप राज ठाकरेंवर करण्यात आला आहे.

शिराळा कोर्टानं जुन्या प्रकरणात जारी केलेल्या वॉरंट जारी केलंय. या आधीदेखील राज ठाकरेंविरोधात वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं. तेव्हा ते चौकशीला हजर राहिले नव्हते. जामीन दिल्यानंतरही राज ठाकरे दिलेल्या तारखेला हजर न राहिल्यानं अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलेलं होतं.



हेही वाचा

आम्ही चूल पेटवण्यासाठी काम करतो, तर ते घर पेटवण्यासाठी - आदित्य ठाकरे

राज ठाकरेंच्या भाषणाची औरंगाबाद पोलिसांकडून चौकशी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा