SHARE

पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली..पोलीस कर्मचा-यांच्या विविध समस्यांवर यावेळी चर्चा करण्यात आली..नंतर राज ठाकरे यांनी पोलिसांच्या समस्येबाबत मुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्याबरोबर चर्चा केली..त्यानंतर आयुक्त काय निर्णय घेणार ते पाहून आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं राज यांनी यावेळी सांगितले.पोलिसांना संरक्षण, सुट्ट्यांची अनियमितता, पोलिसांवर दिवसेंदिवस वाढत जाणारा अतिरीक्त कामाचा ताण, खालावणारे आरोग्य, संरक्षणाचे प्रश्न आणि निवाससंस्थाचा रखडत असलेला प्रश्न या निमित्ताने राज यांच्यासमोर पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटूंबियांनी मांडले. या भेटीच्यावेळी राज ठाकरे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले.तसंच पोलिसांचे प्रश्न गंभीर असून ते सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू असे राज यांनी सांगितले. 

संबंधित विषय
ताज्या बातम्या